संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि रेडक्रॉस ठाणे, रिद्धी सिद्धी मेडिकल च्या सहकार्याने वंदना एस टी स्टॅण्ड जवळील रेडक्रॉस येथे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत हे शिबीर राबविण्यात आल्याची माहिती संस्कार संस्थेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी बोलताना दिली. यावेळी रेडक्रॉस चे सेक्रेटरी डॉ. राजेश मढवी, रिद्धी सिद्धी मेडिकलचे जितेंद्र जैन उपस्थित होते.
कान, नाक, घसा, दात, त्वचा रोग, मधुमेह, हाडांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, मनोविकार आणि किडनी तज्ञ, जनरल फिजिशियन आदी आजारांवरील डॉक्टर या शिबिरास उपस्थित होते. शेकडो नागरिकांनी या महारोग्यशिबिराचा लाभ घेतला.