सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वाशी खाडी पुलाला भेट दिली. तीसऱ्या वाशी खाडी पुलाच्या कामाची केली पाहणी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. वाशी खाडी पहिला पूल 1971 साली तर दुसरा पूल 1995 साली बांधण्यात आला. आता दोन पुलांचे काम सुरू असून पहिला पूल मे 2024 ला आणि दुसरा पूल सप्टेंबर 2024 ला वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. आता असलेल्या सहा लेन चा रस्ता हे दोन्ही पूल पूर्ण झाल्यावर बारा लेनचा होईल, या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यात मोठी मदत होईल.