चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष

चांद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्यानंतर काल सर्वत्र जल्लोष करण्यात आला. अगदी रेल्वे स्थानकांपासून शाळा शाळांमध्येही असा जल्लोष करण्यात आला. हा जल्लोष करण्यात राजकीय नेते, सामाजिक नेते तसेच शाळा महाविद्यालय मागे नव्हते. ठाण्यातही बेडेकर विद्यामंदिर मध्ये असाच जल्लोष करण्यात आला. चंद्रयान तीन च्या लँडिंग चे थेट प्रक्षेपण शाळेतील विद्यार्थी आणि पालकांनी कॉम्प्युटर लॅब मध्ये संध्याकाळी सहा वाजता उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद अनुभवला. चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाल्याबरोबर सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी टाळ्यांच्या गजरात आनंद साजरा करून भारत माता की जय अशा घोषणा देऊन आपला देशाभिमान व्यक्त केला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading