विधानसभा निवडणूक प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणा-या अधिकारी-कर्मचा-यांवर होणार कारवाई

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणा-या ९०० अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यंदा मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यानं मतदान केंद्रातही वाढ झाली आहे. त्यामुळं मतदान कर्मचा-यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या निवडणुकीचं प्रशिक्षण सुरू असून या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. निवडणुकीचं काम काहिसं त्रासदायक असल्यामुळं अनेकदा हे काम टाळण्याचा प्रयत्न केला जातो. जवळपास ९०० अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच प्रशासकीय कारवाईही केली जाणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading