ठाणे कारागृहातील एका कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे कारागृहात आठवडाभरापूर्वी अपहरणाच्या गुन्ह्यात आणलेल्या २५ वर्षीय कैद्यानं बॅरॅक क्रमांक ६ वर चढून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ठाणे मध्यवर्ती कारागृहात अपहरणाचा गुन्हा दाखल असलेला दीपक गुप्ता हा ८ ते १० दिवसापूर्वी आला होता. त्याला बॅरॅक क्रमांक ६ मध्ये ठेवण्यात आलं होतं. काल सकाळच्या सुमारास त्यानं बॅरॅकच्या छतावर जाऊन खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण यामध्ये तो गंभीर जखमी झाल्यानं त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला जे जे रूग्णालयात पाठवण्यात आलं. कारागृह प्रशासनाच्या प्राथमिक चौकशीत दीपक गुप्ता हा मानसिक रोगी असल्याचं समोर आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading