कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची कमतरता निर्माण झाल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या शिबीराचं उद्घाटन झालं. या शिबीरात गुन्हे शाखा, विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखेच्या १३८ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी रक्तदान केले.