मुंब्रा पोलीस ठाण्याच्या चार पोलीस अधिका-यांना ६ कोटी लुट प्रकरणी संयुक्तिक प्राथमिक चौकशीत क्लीनचीट मिळाली आहे.
एप्रिल २०२२ मध्ये फैजल मेमन या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला आणि त्या ठिकाणाहून कोट्यावधीची रोकड सापडली होती. त्यातून छापेमारी करणाऱ्या पोलीस पथकाने सहा कोटीची रक्कम घेतल्याची तक्रार फैजल मेमन यांचे निकटवर्तीय शेख इब्राहीम पाशा यांनी केली होती. या प्रकरणात ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचा-याना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या संयुक्तिक प्राथमिक चौकशीत निलंबित पोलीस अधिकारी हर्षद काळे, पोलीस नाईक दिलीप किरपण, पोलीस नाईक अंकुश वैद्य आणि पोलीस शिपाई ललित महाजन यांचा सहभाग आढळला नसल्याचा अवहाल चौकशी समितीने दिला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने एकाच खळबळ उडाली होती. तर प्रकरण घडल्यानंतर मात्र तपास अक्रून रात्री पोलीस ठाण्यात आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सिसिटीव्हीत दिसले होते. या घटनेत तब्बल दहा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली होती. तब्बल एका वर्षानंतर या संयुक्तिक प्राथमिक चौकशीत एक अधिकारी आणि दोन पोलीस नाईक आणि एक पोलीस शिपाई यांचा या लुटीच्या प्रकरणात सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले. तर अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत आहे. पोलीस नाईक दिलीप किरपण, पोलीस नाईक अंकुश वैद्य आणि पोलीस शिपाई ललित महाजन हे ठाणे शहर मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. या चारही जणांच्या सुरु असलेल्या संयुक्तिक प्राथमिक चौकशीत त्यांची कसुर निष्पन्न होत नसल्याने त्यांच्या विरोधात सुरु असलेली शिस्तभंग विषयक कार्यवाही या आदेशान्वये रद्द करण्यात येत असून हे प्रकरण बंद करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिलेल्या अंतिम आदेशात नमूद केले आहे.