कोपरी येथे पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. आज संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास कोपरीतील पाईपलाईनला एका कंटेनरने धडक दिल्याने ही ६ इंचाची पाईपलाईन फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं.