स्ट्रोक बाबतची जनजागृती करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन

जागतिक स्ट्रोक दिनाच्या पूर्वसंध्येला स्ट्रोक बाबतची जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेनं ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहाय्यानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. स्ट्रोक हा भारतातील सर्वाधिक बळी घेणारा तिस-या क्रमांकाचा आजार आहे. डीजी ठाणेने आयोजित केलेल्या या आरोग्य विषयक जनजागरूकता मोहिमेत ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी स्ट्रोक बाबतची अत्यंत महत्वाची माहिती, त्याची लक्षणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयीची  माहिती दिली. ठाणे पोलीस आणि वाहतूक पोलीसही यात सहभागी झाले होते. यावेळी स्ट्रोक टाळण्यासाठी आणि एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी डॉक्टरांनी जीवन शैलीतील सुधारणांचं महत्व समजावून सांगितलं. स्ट्रोक आल्यानंतर बचावलेल्या काही लोकांनी त्यांचे अनुभव यावेळी सांगितले. यावेळी अशा लोकांचा महापालिकेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. स्ट्रोकच्या काही प्राथमिक लक्षणाबाबत प्रत्येकाला माहिती असली पाहिजे. अचानक चेह-याचा कमकुवतपणा, हात गळपटणे, विचित्र संभाषण किंवा बरळणे ही स्ट्रोकची काही प्राथमिक लक्षणं आहेत. स्ट्रोक आल्यानंतर पहिल्या साडेचार तासात योग्य उपचार झाल्यास अपंगत्व येण्याची शक्यता येते. या काळात वैद्यकीय उपचार झाल्यास अत्यल्प अपंगत्व किंवा पॅरालिसीससह रूग्ण वाचण्याची शक्यता वाढते अशी माहिती न्युरोलॉजिस्ट डॉ. योगेश घाडगे यांनी यावेळी दिली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: