वृक्ष प्राधिकरण समितीमधील नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांची वर्णी लावण्यासाठी टाकण्यात आलेला दबाव झुगारून वनखात्याने या दोघांनाही अपात्र ठरवले आहे. या दोघांच्याही शैक्षणिक पात्रतेबाबत न्यायालयानं संशय व्यक्त केल्यामुळे उप वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी या संदर्भातील पत्र पालिका आयुक संजीव जयस्वाल यांना पाठवले आहे. त्यामुळं दबाव आणून नम्रता भोसले-जाधव आणि विक्रांत तावडे यांना वृक्ष प्राधिकरण समितीमधअये समाविष्ट करण्याचा डाव उधळण्यात आला आहे. या दोघांच्या शैक्षणिक अपात्रतेचा पर्दाफाश आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. दरम्यान न्यायालयानं संशय व्यक्त केल्यानंतरही या दोघांची शिफारस केल्याने त्या विरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्यपदी माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र या दोघांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात मोठा संभ्रम आहे. या दोघांनी हिमालयीन युनिव्हर्सिटी, ईटानगर अरूणाचल प्रदेश येथील पदवी सादर केली आहे. विशेष म्हणजे एकाच वर्षात या दोघांनी पदवी घेतली आहे. तावडे यांनी मे २०१७ मध्ये बॅलर ऑफ सायन्सची तर भोसले यांनी डिसेंबर २०१७ मध्ये डिप्लोमा ऑफ ॲग्रीकल्चर अशी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं दाखवलं आहे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर न्यायालयानं संशय व्यक्त केला असतानाही पुन्हा त्यांचीच वर्णी लावण्याचा प्रयत्न होत होता. हा सर्व प्रकार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणला होता. दरम्यान नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांचं सुचवणं बेकायदेशीर असल्याचं पत्र उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिल्याचं वृत्त चुकीचं असून त्यांनी कागदपत्रांची पडताळणी आपल्या स्तरावर करावी असं नमूद केलं आहे. आमची करण्यात आलेली नियुक्ती ही नियमानुसार असून हे वृत्त राजकीय हेतूने पसरविले जात असल्याचं भोसले- तावडे द्वयींनी म्हटलं आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: