ठाणे महापालिकेमध्ये अजब कारभार

ठाणे महापालिकेमध्ये अजब कारभार सुरू असल्याचं दिसत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये अवघ्या ५ मिनिटात ९०० कोटींचे प्रस्ताव मंजूर केले जात असताना ४५ लाखांच्या खर्चाच्या मंजुरीसाठी मात्र मॅरेथॉन चर्चा झाल्याबद्दल नाट्य प्रेमींकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाणे महापालिकेच्या अलिकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील उड्डाण पूलांवरील वाढीव खर्च, दीडशे बसेसची दुरूस्ती, थीमपार्कच्या चौकशीचा मुद्दा आणि ९०० कोटींचे रस्त्यांचे प्रस्ताव अवघ्या काही मिनिटात सर्वसाधारण सभेत मंजूर झाले. त्यावेळी मात्र कोणतीही चर्चा झाली नाही. तर डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरसाठी लागणा-या खर्चाच्या मान्यतेसाठी मात्र लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांची तब्बल ५ तासाहून अधिक चर्चा झाली. अलिकडेच महापौरांनी या मिनी थिएटरची पाहणी केली होती. या बैठकीत या नाट्यगृहाच्या दुरूस्तीवरील खर्च कसा कमी करता येईल यावर काथ्याकूट झाल्याचं सांगितलं जातं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: