पालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना मिळणार किमान वेतनाच्या फरकाची रक्कम पाच हप्त्यात मिळणार थकबाकी

दिवाळी सणाची लगबग सुरू असतानाच आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापौर मिनाक्षी  शिंदे आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थिततीत कामगारांच्या सर्व न्याय मागण्या मान्य करतानाच कंत्राटी कर्मचा-यांना किमान वेतन कायद्यानुसार फरकाची रक्कम देण्याचा, 6 व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याचा, आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा, वेतन त्रुटी दूर करण्याचा, 6 व्या वेतन आयोगानुसार विविध भत्ते लागू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्याबरोबरच परिवहन सेवेच्या 613 कर्मचा-यांना 1 महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे महापालिकेवर जवळपास 100 कोटींचा बोजा पडणार आहे.

आज झालेल्या या संयुक्त बैठकीत पालिका  घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे कंत्राटी पद्धतीने काम करणारे 206 कुशल आणि 1546 अकुशल कामगार, आरोग्य विभागाकडील 232 कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षण विभाग, उद्यान विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलनिःसारण विभाग या ठिकाणी काम करणा-या कंत्राटी कर्मचा-यांना फेब्रुवारी 2015 ते 31 आॉक्टोबर 2016 या कालावधीतील किमान वेतन कायद्यानुसार मिळणारी फरकाची रक्कम पाच हप्त्यात देण्याचा निर्णय घेतला. यातील पहिला हप्ता डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आणि महिला आणि बाल कल्याण आरोग्य कार्यक्रमातंर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणा-या कर्मचा-यांनाही सरळसेवा नियुक्तीप्रमाणे देय असलेल्या पगाराच्या 60 टक्के किंवा किमान वेतन कायद्यानुसार जे जास्त असेल ते वेतन देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. तसेच महापालिके्या स्थायी आस्थापनेवरील कर्मचा-यांच्या ग्रेड पे मधील त्रुटी दूर करून त्यांना सुधारित नियमानुसार वेतन निश्तित करण्यात येणार असल्याचे सांगितले. याचा जवळपास 7 हजार कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे. यामुळे ग्रेड पे मध्ये 35 टक्केने वाढ होणार आहे. निवृत्त न्यायमुर्ती   गायकवाड यांच्या वेतन त्रुटी समितीच्या अहवालानुसार तांत्रिक पदांची वेतन श्रेणी राज्य शासनाच्या धर्तीवर सुधारित करणार तसेच शासन निर्णयानुसार आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच अग्नीशमन दलातील कर्मचा-यांना त्यांची जबाबदारी विचारात घेवून उच्च वेतनश्रेणीत समाविष्ट करूण्याचा निर्णय घेण्यात आला. या महत्वाच्या निर्णयाबोरबरच कर्मचा-यांना विशेष पुरक भत्ता, वैद्यकिय भत्ता, वाहतूक भत्ता, अपंग महिला कर्मचारी विशेष भत्ता, नर्सिंग भत्ता देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
ठाणे परिवहन सेवेतील 613 अस्थायी कर्मचा-यांना एका महिन्यात नियमित करण्याचा महत्वाचा निर्णयही महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. याबाबत सर्व कर्मचा-यांनी अनेक दिवसांपासून पालकमंत्री  एकनाथ शिंदे तसेच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. या निर्णयामुळे 2006 पासून प्रलंबित असलेला 613 कर्मचा-यांचा प्रश्न ऐन दिवाळीत मार्गी लागला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading