कल्याणमध्ये विहिरीत गुदमरून ५ जणांचा मृत्यू

कल्याणमध्ये विषारी वायूनं गुदमरून एका पुरातन विहिरीत ५ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चक्कीनाका ते लोकग्राम मार्गावरील भीमाशंकर मंदिर परिसरात ही पुरातन विहीर आहे. भीमाशंकर मंदिराच्या परिसरात ही विहीर आहे. गेली अनेक वर्ष डागडुजी झाली नसल्यानं परिसरातील सांडपाणी या विहीरीत वाहून येते. अनेक वर्ष सफाई झाली नसल्यानं या विहिरीत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचला होता. या विहिरीतील कचरा आणि गाळ काढण्यासाठी राहुल गोस्वामी उतरले होते. पण ते परत न आल्यानं त्यांचे वडील गुणवंत गोस्वामी मुलाला बघायला विहीरीत उतरले पण हे दोघेही विहीरीच्या गाळात अडकला. त्यानंतर कमलेश यादव हाही विहिरीत उतरला होता. या अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे आनंद शेलार आणि प्रमोद वाघचौरे हे या विहीरीत उतरले होते. पण विहीरीतील गाळामध्येच ते अडकले आणि विषारी वायुमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षेची कोणतीही साधनं वापरली नसल्यामुळं दुर्गंधीमुळे चक्कर येऊन ते विहीरीत कोसळल्याचं सांगितलं जातं. शव विच्छेदनाच्या अहवालानंतरच या मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकणार आहे. डोंबिवली मध्येही यापूर्वी गटारात गुदमरून २ कामगारांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment

%d bloggers like this: