दिवाळी दरम्यान पाणी कपात रद्य

दिवाळी सणानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दर बुधवारी आणि दर गुरुवारी होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली असून शनिवार दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ ते ९ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शटडाऊन घेण्यात येणार नाही.

उल्हास नदीतील पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत जलसंपदा विभागाने चौदा टक्के पाणी कपात करणेकरिता सर्व पाणी उचल संस्थाना कळविले असल्याने स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर बुधवारी २४ तास तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने तर गुरुवारी २४ तास पाणी पुरवठा बंद करण्यात येतो.पण येत्या दिवाळीत नागरिकांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी कपात करता पुरवठा नियमित सुरु राहणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: