कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी टीसा हाऊस येथे संपर्क साधण्याचं आवाहन

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स यांच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून प्रशिक्षणार्थींनी टीसा हाऊस येथे संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे.

Read more

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास नियोजन आराखडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या कृती आराखड्याची निवड

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार (‘अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट प्लॅनिंग’) स्पर्धेत महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्याच्या कौशल्य विकास कृती आराखड्याची निवड झाली आहे.

Read more

जिल्हयातील १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना हेल्थकेअर, पॅरामेडिकल, नर्सिंग आणि डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी

वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक प्रशिक्षित मुनष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरीता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हयातील १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना हेल्थकेअर, पॅरामेडिकल, नर्सिंग आणि डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विकास विभागामार्फत राज्यात एकूण २० हजार उमेदवारांना हेल्थकेअर, पॅरामेडीकल आणि नर्सिंग, डोमेस्टिक वर्कर या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read more

बेरोजगारांना कामाची संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास केंद्रातर्फे ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन

बेरोजगारांना कामाची संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ७ ते १५ जुलै दरम्यान ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.

Read more