कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी टीसा हाऊस येथे संपर्क साधण्याचं आवाहन

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स यांच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून प्रशिक्षणार्थींनी टीसा हाऊस येथे संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. टीसा आणि कोसिआ यांच्या वतीने गेल्या 7 वर्षांपासून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू तरुण- तरुणींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून ह्या कार्यक्रमाचे मुख्य धेय्य रोजगार निर्मिती करणे,रोजगार वाढविणे, प्रशिक्षणार्थीला उद्योगाशी निगडित संपूर्ण व्यावहारिक ज्ञान देणे आणि त्यांच्या मध्ये रोजगाराभिमुख कौशल्य निर्माण करणे हे आहे. आतापर्यंत सुमारे ४ हजाराहून अधिक युवक-युवतींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून त्यातील अनेकांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत किंवा नोकऱ्या मिळवल्या आहेत. कौशल्य प्रशिक्षणाअंतर्गत अकॉउंटस असिस्टंट टॅली ऑपरेटर, टॅली जीएसटी सह संपूर्ण अकॉउंटिंग आणि टँक्सेशन, बेकरी प्रशिक्षण, बेसिक टेलरींग आणि ब्युटीपार्लर कोर्स याचे प्रशिक्षण दिले जाते. कौशल्य विकास प्रशिक्षण कल्याण, डोंबिवली , ठाणे , कांदिवली ,चेंबूर ह्या ठिकाणी विविध केंद्रावर होत असून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर कोसीआ ह्या अखिल भारतीय शिखर संस्थेच्यावतीने तसेच स्थानिक केंद्रातर्फे सर्टिफिकेट प्रदान करण्यात येईल. संस्थेतर्फे सर्व विषयाचे प्रशिक्षण तज्ञांद्वारे दिले जात असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शुल्क आकारले जात नाही. ज्यांना ह्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी टीसा हाऊस संपर्क साधून नोंदणी करावी असे आवाहन संस्थेनं केलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading