ईकबाल कासकरला शाही वागणूक देणारे ५ पोलीस निलंबित

ठाण्यातील व्यापाऱ्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी मोक्का कारवाई अंतर्गत ठाणे कारागृहात बंदिस्त असलेल्या इकबाल कासकरला देण्यात आलेली वागणूक ५ पोलीसांना चांगलीच महागात पडली आहे. कासकरला  उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले होते. उपचारानंतर कासकरने दिवसभर रुग्णालयाच्या आवारात आलिशान कारमध्ये बसून अनेकांशी गुप्तगू केलं. हे त्याच्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस उपनिरिक्षकासह ४ कॉन्स्टेबलना महागात पडलं आहे. कासकरला वैद्यकीय उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले होते. त्याचे दात दुखत असल्याने दातांची तपासणी आणि उपचारासाठी न्यायालय आणि जेल प्रशासनाने मुभा दिली होती. त्यानुसार दातांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी इकबाल कासकरला मधुमेह असल्याने शुगर तपासणीचा सल्ला दिला. अवघ्या 20 मिनिटात कासकरचे  उपचार उरकण्यात आले. त्यानंतर कासकर सायंकाळपर्यंत सिव्हिलच्या आवारातच मोकाट फिरत होता. काळ्या रंगाच्या काचा असलेल्या कारमध्ये हातात सिगारेट शिलगावून फोनाफोनी करीत अनेकांच्या भेटीगाठी घेताना दृष्टीस पडला होता. त्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी उपनिरिक्षक रोहिदास पवार, कॉन्स्टेबल पुंडलिक काकडे, विजय अलोरे, कुमार पुजारी आणि सूरज मानवार यांना निलंबित केलं आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading