पोलीसाच्या दुचाकीला धडक मारून पुन्हा त्यालाच मारहाण करण्याचा प्रकार धर्मवीर नगर येथे घडला आहे. चितळसर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई असणारे जगदिश थोरात हे गस्तीवर असताना हा प्रकार घडला. रात्री साडेनऊच्या सुमारास जगदिश थोरात हे गस्त घालत असताना त्यांच्या दुचाकीला दुस-या दुचाकीनं पाठीमागून धडक मारली. म्हणून याचा जाब विचारायला जगदिश थोरात दुचाकीस्वाराला विचारायला गेले त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या दोघा तरूणांनी थोरात यांनाच धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रकार घडला. पोलीसांनी याप्रकरणी विकी पवार याला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून अटक केली आहे.
