एकाच राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये पितापुत्राचा पदक जिंकण्याचा पराक्रम

एकाच राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याचा पराक्रम अंबर जोशी आणि कुशाग्र जोशी या पितापुत्रानं केला आहे. कुशाग्र जोशी हा सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिकत आहे. कुशाग्रनं राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेमध्ये कुमार आणि ज्युनियर अशा दोन्ही वयोगटांमध्ये कांस्यपदकं पटकावली आहेत. कुशाग्रचे वडील अंबर जोशी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पॉवर लिफ्टर आहेत. व्यवसायानं ते वकील असून मे २०१८ मध्ये आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व करत रौप्य पदक पटकावलं होतं. नुकत्याच लखनौ येथे झालेल्या क्लासिक राष्ट्रीय अनएक्वीपड स्पर्धेमध्ये कुशाग्रनं कुमार गटात कांस्य पदक तर त्याचे वडील अंबर जोशी यांनी मास्टर गटात सुवर्ण पदक पटकावलं. एकाच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याचा पराक्रम कुशाग्र आणि अंबर जोशी या पितापुत्रानं केला आहे.

 

 

Leave a Comment

%d bloggers like this: