इलटनपाडा डॅम नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करा – खासदार राजन विचारे

ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी आपल्या मतदारसंघातील नवी मुंबईतील ब्रिटिश कालीन असलेला इलटनपाडा डॅम दुरुस्ती अभावी धोकादायक स्थितीत झाल्याने त्याची दुरुस्ती व
धरणातील पाणी पिण्यासाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी हा डॅम नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करा अशी जोरदार मागणी खासदार राजन विचारे यांनी माननीय रेल्वेमंत्री यांना
शून्य प्रहर मार्फत सभागृहात केली आहे. 165 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बोरीबंदर ते ठाणे या सुरू झालेल्या भारतातील पहिल्या रेल्वे च्या वाफेवरील इंजिन साठी लागणारे पाणी या डॅम मधून पुरविले जात
होते. कालांतराने वाफेची इंजिन बंद होऊन विद्युत इंजिन सुरू झाले.आणि या धरणाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. दुरुस्ती अभावी हे धरण धोकादायक स्थितीत झाल्याने कोणत्याही क्षणी फूटून
समोरील रहात असलेल्या 25 हजार लोकवस्तीला धोका होऊ शकतो. या धरणाची दुरुस्ती करावी तसेच या धरणातील पाणी हि रोज वापरात यावे. यासाठी हे धरण कायम स्वरूपी महापालिकेला
हस्तांतरित करावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनाकडे वारंवार हे धरण हस्तांतरित करून घेण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली. परंतु गेले २० वर्ष रेल्वे प्रशासनाने अद्याप कोणताही
निर्णय यावर घेतला नसल्याने खा. राजन विचारे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू असताना या धरणातील पाणी वापरण्यासाठी ३ महिन्याकरिता रेल्वेने याला मंजुरी दिली होती. त्यानंतर मा. पियुष
गोयल यांचीही भेट घेऊन वस्तुस्थिती फोटो द्वारे दाखविण्यात आली होते. शून्य प्रहरात चर्चा करताना खासदार राजन विचारे यांनी नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे डॅम ची भिंत
तुटून लोकांना प्राण गमवावे लागले होते. अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हा डॅम कायमस्वरूपी नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करावा अशी जोरदार मागणी सभागृहात
केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading