व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट यंत्राची राजकीय प्रतिनिधींसमोर चाचणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट म्हणजेच व्हीव्हीपीएटी यंत्राची काल राजकीय प्रतिनिधींसमोर चाचणी घेण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याला १२ हजार ६५९ मतदान यंत्र, ७ हजार ३६१ नियंत्रण यंत्र आणि ७ हजार ३६१ व्हीव्हीपीएटी यंत्र प्राप्त झाली आहेत. यांची चाचणी सध्या सुरू असून ही चाचणी समाधानकारक असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. या प्राप्त झालेल्या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आणि भेल कंपनीच्या अभियंत्यांमार्फत १७ सप्टेंबर पासून सुरू आहे. या प्रथमस्तरीय तपासणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींमार्फत सराव मतदान सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर या तिन्ही यंत्रणेंद्वारे मतदान होणार आहे. व्हीव्हीपीएटी यंत्रामुळे मतदारांना त्यांनी केलेलं मतदान त्याच उमेदवाराला झाल्याची खात्री त्याच ठिकाणी मिळणार आहे. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा आरोळकर यांनी या यंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले.

Leave a Comment

%d bloggers like this: