जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पुरूष गटात राजेश गोहिल तर महिला गटात समृध्दी घाडीगावकर विजेती

रोटरी क्लब ऑफ ठाणे एंजल्स आणि ठाणे जिल्हा कॅरम संघटनेतर्फे आयोजित स्टायकर्स ऑफ ठाणे २०२० जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पुरूष एकेरीत चौथा मानांकीत राजेश गोहिल तर महिला एकेरीत आणि ज्युनियर गटात खेळणारी समृध्दी घाडीगावकर विजेती ठरली आहे. पुरूष एकेरीच्या रंगतदार ठरलेल्या अंतिम लढतीत राजेश गोहिलनं राजेंद्र कदमचा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. महिलांच्या अंतिम फेरीचा सामना दोघा बिगर मानांकीत खेळाडूंमध्ये रंगला. त्यामध्ये समृध्दी घाडीगावकरनं सखी दातारचा पराभव करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. पुरूष गटात अस्लम चिकटे आणि महिला गटात चैताली सुर्वे तिस-या स्थानाचे मानकरी ठरले. या स्पर्धेचं औचित्य साधून कॅरमसाठी ५० वर्ष योगदान देणा-या ज्येष्ठ कॅरम पटू विजय कोळी आणि वीरसेन नाखवा यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading