ठाणे महापौर चषक बालनाट्य महोत्सवाचे 25 आणि 26 डिसेंबरला आयोजन

ठाणे शहरातील बालकलाकारांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘ठाणे महापौर चषक बालनाट्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या बालनाट्य महोत्सवाचा उदघाटन २५ डिसेंबर, २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता राज्याचे गृह मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महोत्सवातील बालनाटकांचा ठाण्यातील बालचमूंनी आस्वाद घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. बालकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी बालनाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी 25 आणि 26 डिसेंबर या दोन दिवशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात एकूण 14 बालनाटये सादर होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुरेंद्र दिघे दिग्दर्शित ‘स्टीफन हॉकिन्स एक अवलिया शास्त्रज्ञ’, माधवी राणे दिग्दर्शित ’अळी मिळी गुप चिळी, विजय वाघुले दिग्दर्शित ‘ठोंब्या ठोंबीची गोष्ट’, पल्लवी वाघ-केळकर दिग्दर्शित ’टिपजीच्या पोटलीतल्या गोष्टी –परीकथा’, रेणुका चौधरी दिग्दर्शित ’आबासाहेब आम्हाला काही सांगायचं आहे, शंकर धुलगुडे दिग्दर्शित ’शेपटीचा शाप तर विनोद टेंबे दिग्दर्शित ‘नवे गोकुळ’ या बालनाट्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी शेवटच्या सत्रात बाल प्रेक्षकांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading