महापरिनिर्वाण दिनी बेन्जो वाजवण्यास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मज्जाव

महापरिनिर्वाण दिनी बेन्जो वाजवण्यास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मज्जाव केला. ठाणे महापालिकेच्या सभागृह नेते पदाचा कार्यभार अशोक वैती आज घेणार होते. त्यासाठी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे पालिकेत येणार असल्यामुळे पालिका मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून बेन्जो वाजवून आनंद व्यक्त करण्यात येत होता. परंतु महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यास मज्जाव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस समाजासाठी दु:खाचा दिवस आहे. महापालिकेसमोर ढोलताशांचा गजर करण्यात येत असल्याचं समजताच वंचित आघाडीचे राजाभाऊ चव्हाण, संजय मिरगुडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ढोलताशांचा जल्लोष उधळून लावला. नौपाडा पोलीसांनी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं तर बँड पथकाचं सर्व साहित्य जप्त केलं. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केलं. आंबेडकरी समाजासाठी हा दु:खाचा दिवस असताना हा अशोभनीय प्रकार असून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राजाभाऊ चव्हाण यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading