परिवहन सेवेच्या आगारातून इंधन चोरीला जात असल्याचं उघड

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या कळवा आणि वागळे इस्टेट आगारातून इंधन चोरीचा प्रकार ताजा असतानाच आनंदनगर आणि मुल्लाबाग आगारातही इंधनाचा अपहार होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. ठाणे परिवहन सेवेचे शहरामध्ये वागळे इस्टेट, कळवा, आनंदनगर आणि मुल्लाबाग येथे आगार आहे. मुल्लाबाग आगारातून वातानुकुलित बसेस आणि आनंदनगर आगारातून कंत्राटी बसेसचं नियमन केलं जातं. या ठिकाणी बसेसमध्ये रोज लागणारं डिझेल विष्णू कल्याटप्पी याच्या लक्ष्मी रोडवेजच्या १५ टँकरमधून येतं. हा पुरवठादार डिझेलचा अपहार करत असल्याचा प्रकार परिवहन अधिकारी-कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळं समोर आला आहे. इंधन टाकीत भरताना विशिष्ट प्रकारचा नट बसवण्यात आला असून त्याच्या रिटनिंग पाईपद्वारे हा इंधनाचा अपहार केला जात आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात इंधन पुरवठादाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading