प्लास्टीकच्या पुनर्वापराबाबत अतिरिक्त आयुक्तांची विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा

प्लास्टीक पुनर्वापराच्या विविध तंत्रज्ञानाबाबत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी अतिरिक्त पालिका आयुक्तांनी चर्चा केली. शहरात प्लास्टीक कच-यावर राबवण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्लास्टीकचा पुनर्वापर करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी वर्ल्ड बिझनेस कौन्सिल फॉर सस्टनेबल डेव्हलपमेंट कंपनीच्या प्लास्टीक इकॉनॉमी विभागाच्या व्यवस्थापक ईशा सार आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ मंगेश नंदगोपाल यांनी स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांची भेट घेतली. यावेळी विविध कंपन्यांच्या अत्याधुनिक तंत्रांचा वापर, प्लास्टीक पुनर्वापर प्रकल्पाकरिता कसा करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या वतीनं प्लास्टीक वापरावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. शहरात प्लास्टीक बंदीवर राबवण्यात येणा-या सर्व प्रकल्पांबाबत अतिरिक्त आयुक्त उन्हाळे यांनी माहिती दिली. डीजी ठाणे या अत्याधुनिक डिजीटल प्रणालीच्या वतीनं प्लास्टीक वापराबाबत कशाप्रकारे जनजागृती केली जाते याची माहिती यावेळी देण्यात आली. प्लास्टीकचा वापर हा पॅकेजिंगसाठी होत असून ते एकल वापर प्लास्टीक आहे. शहरातील प्लास्टीक एकत्र कसं करता येईल, नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करून त्यांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल, नागरिकांनी जमा केलेल्या प्लास्टीकला उचित भाव कसा देता येईल तसंच प्लास्टीकवर प्रक्रिया करून त्याचा रस्ते बांधणीमध्ये वापर करणं यावर सखोल चर्चा करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading