social

संजय मंगला गोपाळ यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं देशाच्या पातळीवर सामाजिक आणि राजकीय नेतृत्व देण्याची गरज – गजानन खातू

देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कधी नव्हे एवढी चिंताजनक होत असल्यानं संजय मंगला गोपाळ यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं देशाच्या पातळीवर सामाजिक आणि राजकीय नेतृत्व देण्याची गरज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन खातू यांनी व्यक्त केली. व्हीजेटीआय या अग्रगण्य संस्थेतून निवृत्त झालेल्या संजय मं. गो. यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी खातू बोलत होते. यावेळी वासंती वर्तक यांनी संजय मं. गो. यांना बोलतं केलं. यावेळी मं. गो. यांच्या सहका-यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी विविध जन आंदोलनातील संजय मं. गो. यांनी बजावलेली पडद्यामागची कामगिरी उलगडून दाखवली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या फातिमा खडस यांच्या हस्ते संजय मं. गो. यांना मानपत्र प्रदान करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *