ईदच्या दिवशी मुंब्र्यात दोन अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्यानं खळबळ

ईदच्या दिवशी मुंब्र्यात दोन अल्पवयीन मुली घरातून गायब झाल्यानं खळबळ उडाली आहे. अमृतनगर येथे खेळणी विक्रीचा व्यवसाय करणा-या उल्हासनगरमधील व्यापा-याच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात आरोपीनं फूस लावून अपहरण केल्याची तक्रार व्यापा-यानं मुंब्रा पोलीस ठाण्यात केली आहे. दिनेश कुवारिया असं या व्यापा-याचं नाव असून ईद निमित्त मुंब्र्यात त्यांनी खेळण्यांचा स्टॉल लावला होता. खेळणी विक्रीसाठी दिनेश यांची पत्नी देखील आली होती. दुपारच्या सुमारास दिनेश यांच्या मेव्हणीसोबत ती १५ वर्षीय मुलगी देखील मुंब्र्यात आली होती. ईदच्या दिवशी मुंब्र्यात मोठी गर्दी होती. या गर्दीतून सोनल गायब झाली. सर्वत्र शोधूनही न सापडल्यानं अखेर दिनेश यांनी मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुंब्रा पोलीसांकडे केली आहे. ईदच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जमिला शेख यांची १६ वर्षीय मुलगी खाली जाऊन येते सांगून गेली ती पुन्हा परतली नाही अशी तक्रार जमिला यांनी मुंब्रा पोलीसांत केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading