ब्रह्मांड परिसरातील नागरिकांसाठी नवा वॉक वे उपलब्ध

ब्रह्मांड परिसरातील नागरिकांना तंदुरूस्तीसाठी नवा वॉक वे उपलब्ध झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाची यामुळे पूर्ती झाली आहे. या वॉक वेचं अलिकडेच लोकार्पण करण्यात आलं. महापालिका निवडणुकीच्या वेळी स्वस्तिक पाम्स, श्रीजी स्प्लेंडर, तुर्फेपाडा रस्त्याच्या सुशोभिकरणाचा संकल्प भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला होता. त्यावेळी रस्त्यात सुरक्षित वॉक वे उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आयुक्तांकडे सतत पाठपुरावा करून हा वॉक वे पूर्ण केला. शनिवारी याचे लोकार्पण करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading