ठाण्यातील क्रिकेटपटू घडवणा-या शशिकांत नाईक यांचा त्यांच्या शिष्यांनी केला सत्कार

ठाण्यातील क्रिकेटपटू घडवणा-या शशिकांत नाईक यांचा काल त्यांच्या शिष्यांनी सत्कार केला. सेंट्रल मैदानावर हा सत्कार करण्यात आला. कसोटीपटू खंडू रांगणेकरांची कर्मभूमी असलेल्या ठाण्यावर जीवापाड प्रेम करत इथल्या युवा खेळाडूंना घडवण्यात आपल्या आयुष्याची ५० वर्ष पणाला लावून २१ हजाराहून अधिक खेळाडू घडवणा-या शशिकांत नाईक यांचा काल सत्कार करण्यात आला. क्रिकेट हेच जीवन मानणा-या नाईकांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. काल त्यांच्या शिष्यांनी त्यांचा सत्कार करून आपल्या गुरूबद्दल आदर व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading