शिवसेनेच्या गटनेते पदी पुन्हा एकनाथ शिंदेंची निवड

शिवसेनेच्या गटनेते पदी पुन्हा एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आज झालेल्या बैठकीत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांचं नाव गटनेते पदासाठी सुचवलं. एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ ला झाला. १९८० च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी समाजकारणाला सुरूवात केली. १९८४ साली शाखा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तर १९९७ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. २००४ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ अशी सलग विजयाची हॅट्रीक त्यांनी मारली. २०१४ मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते पद भुषवलं होतं. तर त्यानंतर त्यांनी मंत्रीपदही भुषवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली २०१७ मध्ये शिवसेनेला प्रथमच एकहाती सत्ता मिळाली. असे एकनाथ शिंदे आता विधीमंडळात शिवसेनेचे पुन्हा गटनेते झाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading