विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे ग्रामीण पोलीसही सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे ग्रामीण पोलीसही सज्ज झाले असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जवळपास अडीच हजाराहून अधिक पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रात विधानसभेचे ९ मतदारसंघ येतात. यामध्ये १५१० मतदान केंद्र असून यात ११० क्रिटिकल तर ११२ सेन्सेटिव्ह मतदान केंद्र आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुलभतेनं पार पडण्यासाठी ७ पोलीस उपअधिक्षक, २७ पोलीस निरिक्षक, ११७ सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, १५७६ पोलीस कर्मचारी आणि ८०० गृहरक्षक दलाचे जवान तसंच ३ केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading