जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत श्रावणी सावंत दुहेरी मुकुटाची मानकरी

जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ठाण्यातील पिनॅकल क्लबची श्रावणी सावंत ज्युनियर आणि सब ज्युनियर अशी दुहेरी मुकुटाची मानकरी ठरली आहे. सातवी ठाणे जिल्हा रॅकींग टेबल टेनिस स्पर्धा अलिकडेच बदलापूर येथे झाली. या स्पर्धेत २५० खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये ३९ आणि ४९ वर्षाहून अधिक असे ज्येष्ठ खेळाडूही सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये ठाण्याच्याच बूस्टर क्लबच्या आर्या सोनगडकरचा ४ विरूध्द ३ नं श्रावणी सावंतनं पराभव केला. तर मुलांच्या मिडजेट गटात पिनॅकलच्याच मयुरेश सावंतनं बाजी मारली. मेन्स आणि युथ गटात जश दळवी, मिडजेट आणि कॅडेट गर्ल्स गटात रैना भूता विजेती ठरली. भूतानं सलग सहावेळा दुहेरी मुकुटाचा मान पटकावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading