ठाण्यात महापालिकेच्या पाण्याचे विद्युत मीटरच चोरट्यांनी पळवले आहेत. ठाण्यातील कोर्टनाका परिसरातील भिवंडी वाडा, टेरेस बिल्डींग येथील ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाण्याचे इलेक्ट्रॉनिक्स मीटर अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी पळवून नेले. दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याची तक्रार पोलीसात नोंदवण्यात आली आहे.