politicalshivsena

ठाणे जिल्हा शिवसेना शाखा आयोजित गणेश दर्शन स्पर्धेत कळव्याच्या गुणसागर मित्रमंडळाला प्रथम क्रमांक

शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आयोजित गणेशदर्शन स्पर्धेत कळव्याच्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सवास प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. शिवसेनेतर्फे यंदाही श्रीगणेश दर्शन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं या स्पर्धेचं हे तिसावं वर्ष होतं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वागळे इस्टेट या मंडळाला द्वितीय, शिवशक्ती मित्रमंडळ आंबेवाडी या मंडळाला तृतीय, जय भवानी मित्रमंडळ आझादनगर चतुर्थ, जिज्ञासा मित्रमंडळ चरई पाचवा, चैतन्य मित्रमंडळ कामगार हॉस्पीटल सहावा क्रमांक, डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सातवा, नवतरूण मित्रमंडळ बी-केबिन आठवा, ओम शक्ती मंडळ ठाणे पूर्व नववा क्रमांक तर एकविरा मित्रमंडळ महागिरी कोळीवाडा मंडळाच्या सजावटीस दहाव्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. चेतन गवळी आणि निळकंठ गोरे यांच्या मूर्तीला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. श्रीगणेशोत्सव लोकमान्य आळी आणि शासकीय कर्मचारी गणेशोत्सव प्रादेशिक मनोरूग्णालय या मंडळांना आदर्श गणेशोत्सव मंडळाचं पारितोषिक मिळालं आहे. शिवगर्जना मित्रमंडळ आणि शिवसाई मित्रमंडळाच्या सजावटीस उत्कृष्ट माध्यमाचं पारितोषिक मिळालं आहे. तर ९ मंडळांना विशेष पारितोषिकं देण्यात आली आहेत. १० गणेशोत्सव मंडळांना गुणवत्ता पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे तर जीवलग मित्रमंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे.

Comment here