politicalshivsena

शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांसाठी मोठी मदत रवाना

ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध डॉक्टर संघटना, जिल्हा सामान्य रूग्णालय आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ७० डॉक्टरांचं वैद्यकीय मदत पथक काल सांगली कोल्हापूरकडे रवाना झाले. यावेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. या वैद्यकीय मदत पथकात सर्व तज्ञ डॉक्टरांचा समावेश असून आजपासून सलग ५ दिवस सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात महाआरोग्य शिबीराचं आयोजित करण्यात आलं आहे. प्रत्येकी १० डॉक्टरांचं एक पथक करण्यात आलं असून ही १० वैद्यकीय मदत पथकं विविध भागात तपासणी आणि औषध पुरवठा करणार आहेत. याबरोबरच पूरग्रस्तांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, टॉवेल, अंतर्वस्त्र, पेस्ट, बिस्किटस् अशा जीवनावश्यक वस्तूही देणार आहेत. कल्याण, उल्हासनगर शिवसेनेच्या वतीनं १० हजार चादरी, ब्लँकेटस्, १० हजार नागरिकांना पुरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरूषांचे सर्व प्रकारचे कपडे, अन्नधान्य, खाद्यतेल, बिस्किटस् आणि खाद्यपदार्थांचंही वितरण केलं जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे गेले ४ दिवस कोल्हापूर, सांगली परिसरात तळ ठोकून असून तिथे वेगवेगळ्या छावण्यांमध्ये त्यांच्या पुढाकारानं निवास आणि जेवणाची सोय केली जात आहे. तसंच आवश्यक त्या व्यक्तींवर वैद्यकीय उपचारही केले जात आहेत.

Comment here