विविध पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हस्तातंरण

ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ५ मधील विविध पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हस्तातंरणाचा कार्यक्रम काल झाला. या कार्यक्रमात घरफोडी, जबरी चोरी, फसवणूक या गुन्ह्यातील सुमारे ३२ लाखांचे ८४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसंच मोबाईल चोरी आणि मालमत्ता हरवणे प्रकरणातील साडे चोवीस लाखांचे १५६ मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. चोरीच्या गुन्ह्यातील १६ मोटर सायकल, ९ चारचाकी वाहनं, २ लॅपटॉप असा सव्वा २८ लाखांचा ऐवज संबंधितांना परत करण्यात आला. या मुद्देमाल हस्तांतरण अंतर्गत एकूण १ कोटी ४ लाख रूपयांचा मुद्देमाल संबंधितांना पोलीस उपायुक्तांच्या हस्ते परत करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading