घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे – उदय निरगुडकर

शहराच्या सांस्कृतिक जीवनाची मूळं घट्ट ठेवण्याचं काम मराठी ग्रंथसंग्रहालय आणि व्यास क्रिएशन्सनी केलं आहे. जेव्हा मन निराश होते, दुर्धर प्रसंग ओढवतात तेव्हा शास्त्रीय संगीत आणि पुस्तकं आधार देतात. घरात जसं देवघराचं स्थान असतं तसं पुस्तकांच्या कपाटालाही असलं पाहिजे असे विचार ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथसंग्रहालय आणि व्यास क्रिएशन्स आयोजित पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचा समारोप निरगुडकरांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. वाचकाला जे पुस्तक हवं आहे ते पुस्तक उपलब्ध करून देणारी जागा म्हणजे वाचनालय असं निरगुडकरांनी सांगितलं. यावेळी अनुपमा उजगरे लिखित बिलोरी कवडसे या ललित लेख संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. तीन दिवस चाललेल्या या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात सुमारे २५ हजाराहून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading