कळवा दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागसमित्यांमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत.

 त्यानुसार प्रभागसमितीतील सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत कारवाई करण्यात येणार असून कारवाईची मोहिम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी. जी गोदेपुरे व अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत आज कळवा आणि दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहेत. आज कळवा दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेने हातोडा चालविला. प्रभागसमितीतील अनधिकृत बांधकामावर कारवाईसोबत एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही महेश आहेर यांनी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading