बोरीवली रेल्वे स्थानकांच्या धर्तीवर मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांचा विकास होणार – खासदार राजन विचारे

ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा व मुख्य रेल्वे प्रबंधक नीरज वर्मा यांची चर्चगेट येथे भेट घेऊन आयोजित केलेल्या बैठकीत मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या समस्या मांडल्या. या बैठकीत सर्वप्रथम एम आर व्ही सी च्या MUTP ३A प्रकल्पा मार्फत पश्चिम रेल्वे मार्गावरील ८ रेल्वे स्थानकांचा विकास कामास मंजुरी मिळाली असून यामध्ये मिरा रोड व भाईंदर या दोन्ही रेल्वे स्थानकांचाही समावेश खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने करण्यात आला आहे. त्यामधील मिरा रोड रेल्वे स्थानकाच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू झाले असून लवकरच याचे काम सुरू होणार आहे असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून मिळालेले आहे.

तसेच खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर या रेल्वे स्थानकात प्रवाशांना वसई मार्गावरून येणाऱ्या लोकल गर्दीने भरून येत असल्याने मिरा रोड व भाईंदर या रेल्वे स्थानकातील प्रवाशांना रेल्वेमध्ये चढता येत नाही. यासाठी दोन्ही रेल्वे स्थानकातून पिकअवर्स मध्ये जास्तीत जास्त फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची विनंती करण्यात आलेली आहे. तसेच मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर स्टाफ कमी असल्याने प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी यु टी एस प्रणाली मार्फत स्टेशन पासून ५ किलोमीटर अंतरावरावरील प्रवाशांनी मोबाईल द्वारे तिकीट कसे काढावे याचे रेल्वे स्थानकात रेल्वे तर्फे स्टॉल उभारून प्रवाशांना मार्गदर्शन करावे. याचा सप्ताह रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात यावा.जेणेकरून प्रवाशांना सोयीस्कर होईल. रेल्वेने या मागणीला अनुकूलता दर्शवली असून हे सर्व रेल्वे स्थानकात सुरू करू असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भाईंदर रेल्वे स्थानकात पश्चिमेकडील बालाजी नगर दिशेस जाणाऱ्या नवीन पुलाच्या उभारणीसाठी फलाटावरील काढण्यात आलेले पत्रे तातडीने बसवून त्या ठिकाणी सरकते जिन्याचे काम वेळेत पूर्ण करावे अशा सूचना खासदार राजन विचारे यांच्याकडून देण्यात आला.

भाईंदर पूर्व व पश्चिम बाजूस रेल्वे प्रशासनाची जागा नसल्याने दुचाकी वाहनांना पार्किंग करण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे मीरा भाईंदर मीरा  महापालिकेमार्फत डीपी प्लॅन बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये दुचाकी पार्किंग साठी जागेचा समावेश करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकाशेजारी असलेली जागा निवडून  मला कळवावे. मीरा भाईंदर महापालिका आयुक्त व रेल्वे यांच्यासोबत लवकरच संयुक्त पाहणी करून बैठक आयोजित करण्याचे सुचविण्यात आलेले आहे. रेल्वेनेही बैठकीस आम्ही उपस्थित राहू असे आश्वासन खासदार राजन विचारे यांना देण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading