पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची ५२१ रिक्त पदं भरण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत होती ती आता १५ डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली असल्याचं पोलीस आयुक्तालयातर्फे कळवण्यात आलं आहे.