घोडबंदर रस्त्यावर रिक्षा रस्ता दुभाजकाला धडकल्यानं झालेल्या अपघातात रिक्षा चालक जखमी

घोडबंदर रस्त्यावर आज रात्रीच्या सुमारास रिक्षा रस्ता दुभाजकाला धडकल्यानं झालेल्या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला. आज रात्री ९ च्या सुमारास घोडबंदर रस्त्यावर वाघबीळ नाक्याजवळ ठाण्याकडे येणा-या रिक्षाचा अपघात झाला. रिक्षा चालक कुशल राठोड यांची रिक्षा रस्ता दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये राठोड यांचा पाय रिक्षात अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी मेटल कटरच्या सहाय्याने पत्रा कापूर राठोड यांना बाहेर काढले. राठोड यांच्या पायाला गंभीर दुखापत झआली असून त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading