आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बारावी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही विनामूल्य बोर्ड पद्धतीने सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आलं आहे. या सराव परीक्षेचे हे नववे वर्ष असून ४ डिसेंबरपासुन प्रत्येक रविवारी या परिक्षा होणार आहेत. यावर्षी ठाणे शहरासह भांडुप पर्यतचे तब्बल १ हजार विद्यार्थी सराव परीक्षेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती केळकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ८ जानेवारी रोजी या परिक्षेचा निकाल जाहीर होणार असुन उत्तीर्ण विद्यार्थ्याना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर करीअर गायडन्सच्या विशेष मार्गदर्शनाचे आयोजनही यावेळी केले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क – संतोष साळुंखे ९९२२०५६०६०, पंढरीनाथ पवार – ८०८२३७७७११

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading