ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंची राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी विजयदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. श्री दुर्गा माता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग, जिम स्वीम ॲकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा नुकतीच विजयदुर्ग येथे झाली. यामध्ये स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशननं ३ सुवर्णपदक, 2 रौप्यपदक, 4 कांस्यपदकासह पहिल्या दहा स्पर्धंकांमध्ये येत चमकदार कामगिरी केली. 3 कि.मी. स्पर्धेत सोहम साळुंखे याने रौप्यपदक पटकाविले, स्नेहा लोकरे हिने पाचवा क्रमांक मिळविला तर आयुष तावडे आणि सोहम पाटिल याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. 2 कि.मी स्पर्धेत आयुषी आखाडे हिने प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदक, कविता शहा हिने कांस्यपदक तर तृणांश गद्रे, युवराज राव, विकास निसार यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. 1 कि.मी स्पर्धेत फ्रेया शहा हिने सुवर्ण, रुद्र निसार याने रौप्य तर श्रृती जांभळे हिने कांस्यपदक प्राप्त केले. किमया गायकवाड हिने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. 500 मीटर स्पर्धेत माही जांभळे हिने प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदक आणि ओजस मोरे याने कांस्यपदक पटकाविले. तर नक्ष निसार याने चौथा आणि नायरा कौशल हिने पाचवे पारितोषिक प्राप्त केले.
30 कि.मी सागरी जलतरण स्पर्धेत सोहम साळुंखे याने तिसरा क्रमांक प्राप्त करीत 5 तास 59 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली. आयुष तावडे आणि स्नेहा लोकरे यांनी 6 वा क्रमांक प्राप्त केला. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरणतलाव येथे मार्गदर्शक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे, मनोज कांबळे, रुपेश घाग, पुजा आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: