बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँकेत कॅश भरणा करण्याकरीता जाताना लुटणाऱ्या आरोपीस अटक करून  ९ लाख ३३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड शाखा, भिवंडी यांची कॅश बँकेत भरणा करण्याकरीता जाताना लुटणाऱ्या आरोपीस भिवंडी शहर पोलीस ठाणे यांनी अटक करून  ९ लाख ३३ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

बसीन कॅथलिक को-ऑपरेटिव्ह बँकेचे क्लार्क रिजॉय फरेरा आणि त्यांचे सिक्युरिटी बँकेची पावणे बारा लाख रूपयांची रक्कम कल्याणच्या आयडीबीआय बँकेत भरण्यासाठी जात असताना भिवंडी येथे झोमॅटोचे टी शर्ट घातलेल्या दोघांनी त्यांची बॅग खेचून घेतली. आणि ते कल्याणच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी भिवंडीत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलीसांनी तपास करत लखनौमधून अरशद मन्सुरी आणि अब्दुल चौधरी या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत पोलीसांनी ३ लाख रूपये आणि ३ मोबाईल हस्तगत केले. त्यानंतर यातील तिसरा आरोपी सैफअली खान याला अटक करून त्याच्याकडून पुन्हा काही रक्कम जप्त करण्यात आली. असे एकूण ९ लाख रूपये आणि ३ मोबाईल आणि इतर ऐवज पोलीसांनी हस्तगत केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading