ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप

ठाणे शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी रुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं. ठाणे शहर क्षयरोग अधिकारी आणि कोव्हीड सेलचे हेड डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली 480 टीबी रुग्णांना हे धान्य वाटप करण्यात आले. आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे धान्य वाटप करण्यात आले. निक्षय मित्र या योजनेच्या माध्यमातून जवळपास 480 क्षय रुग्णांना धान्य किट वाटप करण्यात आले. या योजनेमध्ये डावखरे यांनी 300 रुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक घेतले आहे, आणि इतर दानशूर लोकांनी 180 रुग्णांना दत्तक घेतले आहे. 4 हजार 800 रुग्णांनी पोषक आहारासाठी आपले नाव नोंदवले आहे. यापैकी 380 रुग्णांना पोषक आहार सहा महिने पुरविण्यात येणार आहे. या निक्षय योजनेमध्ये कोणीही दानशूर व्यक्ती एक रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊ शकते. एका रुग्णासाठी महिन्याला एक हजार प्रमाणे सहा महिन्याकरिता सहा हजार रुपये खर्च येणार आहे. एक दानशूर व्यक्ती कितीही रुग्ण सहा महिन्यासाठी दत्तक घेऊ शकतो. आपले शहर क्षयरोग मुक्त करायचे असेल तर या योजने मध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading