ग्रीष्मा थोरातला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रजत पदक

ठाण्याच्या 14 वर्षाच्या ग्रीष्मा थोरात हिने राष्ट्रीय खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रजत पदकाची कमाई केली आहे.
अश्वमेध वेटलिफ्टिंग फाऊंडेशन, ठाण्याची खेळाडू  ग्रीष्मा थोरात हिने उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या महिला खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 17वर्षाखालील 81 किलो वजनी गटात स्नॅच 67 किलो आणि क्लीन एंड जर्क 90 एकूण 157 किलो वजन उचलून दुसरा क्रमांक पटकावला आहे. कमी वयात वडिलांच्या मृत्यूचा धक्का पचवून आपल्या कष्टाने मेहेनतीने ग्रीष्माने हे यश मिळवले आहे. राष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिले पदक आहे. तिला शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मधुरा सिंहासने आणि  वेटलिफ्टींग प्रशिक्षक दत्तात्रय टोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading