दुकाने- व्यापारी आस्थापनांची नामफलक मराठी/देवनागरी लिपित प्रदर्शित करण्याचे कामगार विभागाचे आवाहन

दुकाने- व्यापारी आस्थापनांवरील फलक मराठी/देवनागरी लिपित प्रदर्शित न करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १५३ दुकाने/व्यापारी आस्थापना मालकांविरुद्ध महाराष्ट्र दुकाने आणि संस्था अधिनियम नुसार कामगार उप आयुक्त कार्यालयाने फौजदारी कारवाई केली आहे. तसेच 15 दुकान मालकांना सुमारे साडेतीन लाख दंड आकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुकान/आस्थापनांनी आपल्या आस्थापनांचे नामफलक मराठी/देवनागरी लिपीमध्ये करावे असे आवाहन कामगार उपायुक्त सं.सं. भोसले यांनी केले आहे. शासनाने प्रत्येक दुकाने आणि व्यापारी आस्थापनांचे नाम फलक मराठी / देवनागरी लिपित प्रदर्शित करण्याच्या अनुषंगाने नियमामध्ये बदल केला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये तपासणी मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये ४५७ दुकाने- व्यापारी आस्थापनांना निरीक्षण भेटी देण्यात आल्या होत्या. त्यातील ३०४ दुकानांची/आस्थापनांची नावे मराठीमध्ये असल्याचे आढळून आले. मात्र, मराठी नामफलक प्रदर्शित न केलेल्या १५३ दुकाने/व्यापारी आस्थापनांच्या मालकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. तसेच अधिनियमातील तरतुदी नुसार १५ आस्थापना मालकांना ३ लाख ४९ हजार इतका दंड करण्यात आला आहे. यापैकी एका आस्थापना मालकाकडून २ लाख ८६ हजार दंड आकारण्यात आला असल्याची माहिती भोसले यांनी कळविली आहे. जिल्ह्यातील दुकाने- व्यापारी आस्थापना मालकांनी आपल्या आस्थापनेचा नामफलक विहित पध्दतीने मराठी/देवनागरी लिपित प्रदर्शित करावा अन्यथा कामगार उप आयुक्त कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येईल असे कामगार उप आयुक्त भोसले यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading