दिवा स्थानकातील कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पूल प्रवाशांनीच केला खुला

दिवा स्थानकातील कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पूल प्रवाशांनीच खुला केला. दिवा स्थानकातील कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पूल तयार झाला होता. मात्र उद्घाटनाअभावी हा पूल बंद ठेवण्यात आला होता. दिवा रेल्वे स्थानकात अनेकदा रेल्वे मार्ग ओलांडताना प्रवासी जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. कालही प्रविण मुळे हा युवक उपनगरीय गाडीचा धक्का बसल्यामुळे जखमी झाला होता. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. पादचारी पूल तयार असताना उद्घाटन मुहुर्तासाठी वाट बघणं म्हणजे प्रवाशांच्याच जीवाशी खेळण्यासारखं असल्यामुळं संतप्त प्रवाशांनी स्वत:हून हा पादचारी पूल खुला केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading