राज्यस्तरीय सुपर स्प्रिंट जलतरण स्पर्धेत स्टारफिशची चमकदार कामगिरी – 20 सुवर्ण, 19 रौप्य आणि 6 कांस्यपदकाची लयलूट

पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय सुपर स्प्रिंट जलतरण स्पर्धेत स्टारफिश नायट्रो संघाने चमकदार कामगिरी करीत 20 सुवर्ण, 19 रौप्य आणि 6 कांस्यपदकाची लयलूट केली आहे. स्टारफिश नायट्रोच्या या दमदार कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील बालगंधर्व जलतरण तलाव येथे 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 7 वर्षाखालील गटामध्ये मुलांमध्ये ओजस मोरे याने 3 रौप्य आणि 1 कांस्य, नक्ष निसार याने 1 रौप्य आणि 2 कांस्यपदके तर मुलींमध्ये माहि जांभळे हिने 5 सुवर्णपदके पटकाविली. 9 वर्षाखालील मुलांमध्ये रुद्र निसार याने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य तर मुलींमध्ये निधी सामंत हिने 8 सुवर्ण 1 रौप्य, फ्रेया शाह हिने 1 सुवर्ण आणि 5 रौप्य तर श्रुती जांभळे हिने 1 रौप्य पदक पटकाविले. 10 वर्षाखालील गटात विराट ठक्कर याने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदक पटकाविले. 11 वर्षाखालील मुलींमध्ये आयुषी आखाडे हिने 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकाविली. 12 वर्षाखालील मुलांमध्ये आदित्य घाग याने 2 रौप्य आणि 1 कांस्यपदक तर 14 वर्षाखालील मुलांमध्ये सोहम साळुंखे याने 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक पटकाविले. हे सर्व जलतरणपटू कैलास आखाडे, रुपेश घाग आणि अतुल पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: